पंचायत समिती चिखलदरा, जिल्हा अमरावती
प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मा. खासदार बळवंत वानखेडे साहेबांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने गावाला स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिक निर्मूलनाकडे नव्या उर्जेसह वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.
या प्रकल्पामुळे गावात प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक वातावरण तयार होण्यास मोठी मदत होणार आहे.